नवनागापूर येथून अकरा वर्षाची मुलगी हरवली

। अहमदनगर । दि.29 ऑगस्ट । घराबाहेर खेळायला गेलेली 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी आलीच नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

नगर मनमाड रोडवरील नवनागापूर येथील सम्राटनगर येथील विष्णू सोमनाथ धोत्रे (वय 35) यांची
11 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घराबाहेर खेळत असताना कुठेतरी गेली. ती अद्याप घरी परतली नाही. 

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी विष्णू धोत्रे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने पळवून नेल्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार पाठक करीत आहे. 

अपहृत मुलीचे वर्णन- ती रंगाने काळी सावळी, सडपातळ, केस काळे छोटे कुरुळे, अंगात टी शर्ट व जिन्स पॅन्ट काळया रंगाचे, गळ्यावर ऑपरेशनचे जुने व्रण आहे. 

या मुलीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे फोन नंबर 0241-2416123 यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post