। अहमदनगर । दि.30 ऑगस्ट । पारनेरला नुकतीच फ्री-स्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा रंगली. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी येथे रंगतदार कुस्त्यांचे सामने झाले. पारनेर येथील छत्रपती कुस्ती संकुलमध्ये तिसरी 23 वर्षाखालील फ्रिस्टाईल व ग्रिकोरोमन मुले व मुली कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेस जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष नाना डोंगरे यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करुन कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी पारनेर तालिम सेवा संघाचे अध्यक्ष व जिल्हा तालिम संघाचे उपाध्यक्ष युवराज पठारे, नगर तालुका सचिव बाळू भापकर, संभाजी देठे, हनुमंत फंड, बापू होळकर, गोकुळ शिंदे, पोपट गागरे, प्रकाश गाढवे, अनिल ब्राम्हणे, सचिन साठे, गुलाब केदार, पोपट शिंदे आदींसह खेळाडू उपस्थित होते. कुस्तीची आवड असलेल्या युवकांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे. अनेक उत्तम कुस्तीपटू पुढे येत असून, कुस्तीपटूंनी सराव व व्यायाम न थांबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून हंगेश्वर धायगुडे, संभाजी निकाळजे, गणेश जाधव, किरण मोरे यांनी काम पाहिले.ही स्पर्धा मॅटवर कोरोनाचे नियम पाळून घेण्यात घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेते खेळाडू इंदापूर (जि. पुणे) येथे मारकड कुस्ती केंद्रात होणार्या महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणीसाठी खेळणार आहे. महाराष्ट्र निवड चाचणीत विजयी झालेल्या खेळाडूंना अमेठी (उत्तरप्रदेश) येथे होणार्या तिसरी 23 वर्षाखालील फ्रिस्टाईल व ग्रिकोरोमन मुले व मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.तब्बल दोन वर्षांनी
रंगले कुस्तीचे सामने
अहमदनगर/प्रतिनिधी- पारनेरला नुकतीच फ्री-स्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा रंगली. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी येथे रंगतदार कुस्त्यांचे सामने झाले. पारनेर येथील छत्रपती कुस्ती संकुलमध्ये तिसरी 23 वर्षाखालील फ्रिस्टाईल व ग्रिकोरोमन मुले व मुली कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेस जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष नाना डोंगरे यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करुन कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी पारनेर तालिम सेवा संघाचे अध्यक्ष व जिल्हा तालिम संघाचे उपाध्यक्ष युवराज पठारे, नगर तालुका सचिव बाळू भापकर, संभाजी देठे, हनुमंत फंड, बापू होळकर, गोकुळ शिंदे, पोपट गागरे, प्रकाश गाढवे, अनिल ब्राम्हणे, सचिन साठे, गुलाब केदार, पोपट शिंदे आदींसह खेळाडू उपस्थित होते. कुस्तीची आवड असलेल्या युवकांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे. अनेक उत्तम कुस्तीपटू पुढे येत असून, कुस्तीपटूंनी सराव व व्यायाम न थांबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून हंगेश्वर धायगुडे, संभाजी निकाळजे, गणेश जाधव, किरण मोरे यांनी काम पाहिले.ही स्पर्धा मॅटवर कोरोनाचे नियम पाळून घेण्यात घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेते खेळाडू इंदापूर (जि. पुणे) येथे मारकड कुस्ती केंद्रात होणार्या महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणीसाठी खेळणार आहे. महाराष्ट्र निवड चाचणीत विजयी झालेल्या खेळाडूंना अमेठी (उत्तरप्रदेश) येथे होणार्या तिसरी 23 वर्षाखालील फ्रिस्टाईल व ग्रिकोरोमन मुले व मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.
Tags:
Ahmednagar