पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोन्याची चेन पळवली

। अहमदनगर । दि.30 ऑगस्ट । पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे लक्ष विचलित करून तिच्या गळ्यातील 12.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरी हिसकावून तोडून चोरून नेली. ही घटना सावेडी परिसरातील चैतन्यनगर येथील गणपती मंदिराजवळ घडली.

याबाबतची माहिती अशी की किरण प्रेमसुख भांगडिया (वय 65, राहणार पद्मा बांगला, आनंदनगर सोसायटी, गुलमोहोररोड, सावेडी) या सकाळी घराजवळ मॉर्निंग वॉक करीत असताना चैतन्यनगर येथील गणपती मंदिराजवळ आल्या असता अ‍ॅक्सेस मोपेडवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने त्यांना शिंदे यांचा बंगला कोठे आहे, असा पत्ता विचारला. 

पत्ता सांगण्यासाठी भांगडिया यांचे त्यांच्याकडे लक्ष विचलित होऊन त्या पत्ता सांगण्याचा प्रयत्न करीत असताना मोपेडस्वारांनी अचानक त्यांच्या गळ्यातील 12.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन त्यात ओम डिझाईनचा पँडेल असलेली बळजबरीने हिसकावून तोडून चोरून नेली.

मानेला हिसका बसताच भांगडिया यांनी आरडाओरडा केला. परंतु नागरिक गोळा होण्याअगोदरच मोपेडवरील दोघे चोरटे तिथून धूम स्टाईल पसार झाले झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post