जिल्हा शिक्षक बँकेची सभा तर विरोधकांची प्रतिसभा!....वाचा सविस्तर

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 102 वी सभा; विरोधकांची प्रतिसभा घेऊन सत्ताधार्‍यांना विरोध

। अहमदनगर । दि.29 ऑगस्ट । जिल्हा शिक्षक बँकेची 102 वी सर्वसाधारण ऑनलाईन पद्धती सुरू झाली. नगर शहरातील एका हॉटेलच्या हॉलमध्ये संचालकाच्या उपस्थितीत सुरू झाली. करोनामुळे बँकेची दुसरी ऑनलाईन सभा आहे. ही सभा सत्ताधार्‍यांनी बंद खोलीत घेतल्याने सत्ताधार्‍यांनी त्यांच्यावर अरोप करत प्रतिसभा घेण्याचा घाट घातला होता.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 102 वी सर्वसाधारण सभा आज (रविवारी) सुरु झाली. या सभेत विरोधकांना मते मांडून देण्याची संधी संचालक मंडळाने दिली नाही. त्यामुळे सत्ताधार्‍यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले असून त्यांनी घोषणाबाजी करत बँकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. 

आम्हाला मत मांडू द्यावे असे म्हणत सत्ताधार्‍यांना विरोधकांनी आवाहन केले. मात्र सत्ताधार्‍यांनी विरोधकांना सभागृहात येऊन दिले नाही. सभागृहाचा दरवाजा बंद ठेऊन सभा सुरुच ठेवली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी प्रतिसभा घेऊन सत्ताधार्‍यांना विरोध केला.

ही सभा गुरुकुल मंडळाचे रा.या.औटी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रविण ठुबे, संजय धामणे, विजय महामुनी, दत्ता दाधव, सुभाष धामणे, राजेंद्र शिंदे, नारायण राऊत, रहेमान शेख, बाळासाहेब कदम, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. या सभेत विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर टीका केली. या सभेत अगोदर सर्व विरोधकांनी सत्ताधारी यांविरोधात घोषणा बाजी करून निषेध केला. सर्वसाधारण सभेत विरोधकांना सत्ताधार्यांना बोलवून दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post