। अहमदनगर । दि.31 ऑगस्ट । जिल्ह्यातील महामार्गांवर वाहने अडवून वाहनचालकाला हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीविरुध्द सात गुन्हे उघडकीस आले आहे.
नितीन मच्छिंद्र माळी (वय 22, मोरे चिंचोरे, ता. राहुरी), गणेश रोहिदास माळी (वय 21, खडकवाडी, मुळा डॅम जवळ, राहुरी), रवी पोपट लोंढे (रा. घोडेगाव, नेवासा), नीलेश संजय शिंदे (वय 21 रा. पारिजात चौक, पाइपलाइन रोड) व एक अल्पवयीन यांना पकडण्यात आले.
या आरोपींचे चार साथीदार फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. राहुरीतील दिलीप तमनर यांना शनिशिंगणापूर फाटा येथे चौघांनी लुटले होते. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वतंत्र्य पथकाने या गुन्ह्याचा तपासा सुरू केला होता.
गणेश माळी व नितीन माळी यांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सोमनाथ दिवटे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, शंकर लोंढे,
विशाल दळवी, शंकर चौधरी, दीपक शिंदे, जालिंदर माने, आकाश काळे यांच्या पथकाने नितीन माळी व गणेश माळी दोघांना राहुरी तालुक्यातील वरंवडी येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी इतर सात साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.