। कोलकत्ता । दि.31 ऑगस्ट । जगातील सर्वात मोठे श्रीकृष्ण मंदिर पश्चिम बंगालमध्ये उभारले जात असून त्यासाठी तब्बल 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. या सात मजली मंदिराची व्याप्ती सुमारे 6 लाख चौरस फूट इतकी असून या मंदिराचे 80 टक्के काम 2023 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
हे मंदिर कोलकाता शहरापासून 130 किमीवर असलेल्या नदीया जिल्ह्यातील मायापुर या शहरात उभारले जात आहे. मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून 80 टक्के काम झाल्यानंतर हे मंदिर भाविकांना खुले केले जाणार आहे. इस्कॉनतर्फे हे मंदिर बांधले जात आहे. निव्वळ मंदिर हे बारा एकर जागेत असणार आहे, तर त्याच्या समोर 45 एकराची बाग असणार आहे.
मंदिरातील कीर्तनाचा हॉलच दीड एकर जागेत असणार आहे. तब्बल 10 हजार भाविक एकावेळी याठिकाणी बसून भजनाचा आनंद लुटू शकतील. तर मंदिराची उंची 350 फूट आणि घुमटाचा व्यास 177 फुटांचा असणार आहे. विश्वाची निर्मिती कशी झाली याची माहिती मंदिराच्या आतील भागात दिली जाणार आहे. मंदिरासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगाचे मार्बल राजस्थान, व्हिएतनाम, फ्रान्स आणि इटलीमधून आणले जाणार आहे.

Tags:
Maharashtra