मनपाने सुरू केली खासगी दुकानांतून कोरोना तपासणी

। अहमदनगर । दि.26 ऑगस्ट । कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने व लॉकडाऊन शिथील झाले असल्याने तिसरी लाट येऊ नये म्हणून मनपाद्वारे दक्षता घेतली जात आहे. महापालिका कोरोना दक्षता पथकांच्यावतीने मागील चार दिवसात 316 खासगी आस्थापना कर्मचार्‍यांची कोरोना (आरटीपीसीआर) चाचणी करण्यात आली आहे. ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.

अहमदनगर महापालिका कोरोना दक्षता पथकांच्यावतीने कोरोना नियमावलीअंतर्गत शहरातील बिग बाजार, दीपक एजन्सी, बिकानेर स्वीटस, रुचिरा स्वीटस, एशियन फार्मसी, काका हलवाई,आसरा ट्रेडर्स अशी विविध दुकाने, मॉल व खासगी आस्थापनांमध्ये काम करणार्‍या 316 कर्मचार्‍यांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. 

या दुकानाच्या व्यवस्थापकांनी स्वतःहून पत्र देत त्यांच्या कर्मचार्‍यांची चाचणी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, अशाच पद्धतीने शहर आणि उपनगरातील व्यावसायिक, दुकानदार आणि खासगी आस्थापना यांनी पुढाकार घेऊन आपल्या कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी केल्यास कोरोना प्रादुर्भाव होण्यास आळा बसेल असे कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांनी सांगितले.

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी केले आहे. आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार्‍या ठिकाणी आयुक्त गोरे,उपायुक्त डांगे यांनी भेट देऊन सूचना दिल्या. 

या तपासणीच्यावेळी सहाय्यक नंदकुमार नेमाणे, सूर्यभान देवघडे, राहुल साबळे, भास्कर आकुबत्तीन, अनिल आढाव, अमोल लहारे, राजेश आनंद, राजू जाधव, रिजवान शेख, विष्णू देशमुख, राजेंद्र बोरुडे, कांगुर्डे, गणेश वरुटे, नंदू रोहोकले, अमित मिसाळ उपस्थित होते. ही चाचणी करण्यासाठी जिजामाता आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आयशा शेख

सिस्टर कविता खिलारी,लॅब टेक्निशियन बाळासाहेब घुमरे,अक्षय चाहेर,डेटा ऑपरेटर मोहिनी दिकोंडा तसेच सिव्हिल आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शिल्पा रंदाळे-चेलवा, तसेच डॉ. मनोहर देशपांडे,सिस्टर वर्षा कोल्हे, डेटा ऑपरेटर ओंकार अंकराम, लॅब टेक्निशियन भावना वैरागर,सोनाली शिंदे व योगेश गडाख यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post