भर पावसात मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे स्वत: गाडी चालवत पंढरपूरला रवाना

। मुंबई । दि.19 जुलै । आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे महापूजेसाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे भर पावसात ते स्वत: गाडी चालवत सपत्निक पंढरपूरला जात आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज दुपारी दोनच्या सुमारास मातोश्री या त्यांच्या निवासस्थानवरुन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. 

मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे.

दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन पंढरपूरच्या दिशेने जाताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी टीपला. मुख्यमंत्री आज मध्यरात्री पंढरपूरच्या मंदिरामध्ये आषाढीच्या पुजेआधी होणाऱ्या पुजेसाठीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पहाटे दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहामधून रुक्मिणी मंदिरात जाणार आहेत.

त्यानंतर ते २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होती. रात्री २.२० मिनिटांनी होणाऱ्या शासकीय महापुजेस ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने रावाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्या सोबत पोलिसांच्या बऱ्याच गाड्याही आहेत. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून त्यांच्या ताफ्यासोबत असणाऱ्या वाहनांची माहितीही सोलापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आलीय.

Post a Comment

Previous Post Next Post