। पंढरपूर । दि.20 जुलै । आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.
यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकर्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.
मी भाग्यवान आहे की मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मी मोठं काहीही केलेले नाही.
तुडुंब पंढरपूर, आनंदाची उधळण असते, ते वातावरण आम्हाला सर्वांना हवंय. लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महापूजेचा मान मिळालेले दाम्पत्य कोण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळेलेले केशव शिवदास कोलते (वय 71) आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई केशव कोलते (वय 66) हे मुळचे संत तुकाराम मठ, वर्धा येथील रहिवाशी आहे.
त्यांना यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला आहे. केशव कोलते हे गेल्या वीस वर्षांपासून पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात एकटेच 24 तास वीणा वाजवून सेवा करीत आहे. त्यांच्या पत्नी इंदूबाई आणि मुलगा ओमप्रकाश कोलते हे वर्ध्यातील आपल्या घरी राहतात.

Tags:
Breaking