। अहमदनगर । दि.19 जुलै । शेतात काम करत आलेल्या पती-पत्नीस तू आमच्या जमिनीत काय करतो, असे विचारल्यानंतर ही जमीन माझी आहे असे त्यांनी म्हणताच चौघांनी त्या पती-पत्नीस काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील ठाकर वस्ती येथे घडली आहे. या मारहाणीत कोंडीभाऊ जाधव व त्यांच्या पत्नी रेश्मा जाधव हे दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की शहाजापूर येथील ठाकर वस्तीवरील कोंडीभाऊ महादू जाधव व त्यांच्या पत्नी रेश्मा हे त्यांच्या शेतात शेतकाम करत होते. यावेळी दिलीप राजू जाधव, सुनील बाबाजी जाधव, राजू चंदर जाधव, सुभाबाई राजू जाधव हे तेथे आले व कोंडीभाऊ यास तू आमच्या जमिनीत काय करतो? असे विचारल्यावर, ही जमीन माझी आहे ‘असे कोंडीभाऊ यांनी म्हणताच
दिलीप जाधव याने त्यांच्या डोक्यात काठी मारून त्यांना जखमी केले व सुभाबाई जाधव यांनी त्यांची पत्नी रेश्मा हीस हाताने मारहाण केली व इतर दोघांनी शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी चौघांविरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पारनेर पोलिस करीत आहेत.
