। मुंबई । दि.08 जून । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर भेट झाल्याने राजकीय वातावरण बदलणार का? असा प्रश्न पडलेला असतानाच या भेटीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपला टोला लगावला आहे. भाजपचे अंदाज नेहमीच चुकत आले, आताही चुकतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फार फार तर 10-15 मिनिटे चर्चा होईल, असं भाजपचे राज्यातील नेते सांगत होते. मात्र, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी 90 मिनिटे चर्चा केली. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांचे महाराष्ट्राबाबतचे अंदाज नेहमीच चुकत आले आहेत. आताही चुकतील, असा टोला राऊतांनी लगावला.
