काळे कपडे घालून कोल्हापूरात मराठा आंदोलकांचे मूक आंदोलन सुरू

। कोल्हापूर । दि.16 जून । मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन कोल्हापूरात सुरु करण्यात आले असून या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जमा झाले.

संभाजीराजे यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. संभाजीराजे आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं.

कोरोनाच्या काळात हे मूक आंदोलन होत असल्याने आंदोलकांना विविध नियमांचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील यावेळी समाधीस्थळी करण्यात आले आहे. आंदोलकांनी देखील मास्कचा वापर केला असून कोरोना नियमांचे पालन केले जात असल्याचे पाहिला मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post