बियाणांचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत

। अहमदनगर । दि.16 जून ।  गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम पेरणीने गती घेतली आहे. मात्र, खरीप हंगामातच बियाणांचे दर वाढल्याने शेतकरी आणखीच आर्थिक अडचणीत सापडला आहे.

यापूर्वी शासन शेतकर्‍यांना मोफत बियाणे देत होते. पण अलीकडे चार वर्षात मोफत बियाणे बंद झाल्याने शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी उन्हाळ्यात सातत्याने अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने विभागात पाऊसमान चांगले राहिले. 


खरीप हंगामात यावर्षी बियाण्याचे दर गगनाला भिडले आहेत तर लॉकडाउनमुळे शेतीमालाला बाजारपेठ नसल्यामुळे दर नाही. भाजीपाल्याला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने जवळ पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यातच शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत हलाखीची झाल्याने खरीप बियाण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा नसल्याचे चित्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post