सरकारने आशा सेविका, कोरोना योध्यांना वार्‍यावर सोडले : हेमलता घोरपडे

। अहमदनगर । दि.08 जून । आज कोरोना 19 या माहामारीत समाजातील काही घटक देवदूत बनवुन आशा सेविका व वार्डबॉय यांच्या रुपाने जनतेच्या घरात जाऊन पॉझिटिव रुग्णांची सेवा करतात व आपला जीव धोक्यात घालवून कोरोना काळात सेवा देताता. आशा सेविकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी शिवराष्ट्र पक्षाच्या कामगार जिल्हाध्यक्षा हेमलता घोरपडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिेलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

घोरपडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आज आपला जीव धोक्यात घालवून कोरोना काळात आशाताई सेवा देतात. तरी हे बेफिकीर प्रशासन इतर गोष्टींची कोटी रूपयांची उधळपट्टी करत असताना. आशाताईंना फक्त 1000 रू मानधन देते. हे एक दुर्देव आहे. यात आशा सेविकांना 5000 मानधन मिळावे ही शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने मागणी आहे.

शिवराष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले की, आरोग्यमंत्री यांनी आशासेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ करावी असे म्हंटले असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या आशा सेविकांना अवघे 1 हजार रुपये मानधन दिले जाते.  या प्रश्‍नावर तातडीने जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून हा प्रश्‍न मार्गी

Post a Comment

Previous Post Next Post