। अहिल्यानगर । दि.21 सप्टेंबर 2026 । दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत श्री गणरायाची पूजा व आरती भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली.या पावन प्रसंगी बँकेचे जनसंपर्क अधिकारी तथा जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे CEO श्री. भारत सोलेपाटील आणि अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट को-ऑप. बोर्डाच्या चेअरमन तथा पश्चिम महाराष्ट्र सहकारी मंडळाच्या संचालिका सौ. जयमाला सोलेपाटील यांच्या शुभहस्ते श्री गणरायाचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली.
पुरोहितांच्या मंत्रघोषात व मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या या पूजाविधीने बँकेच्या परिसरात भक्ती आणि प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी श्री गणरायाच्या चरणी बँकेची उत्तरोत्तर प्रगती, तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि यश लाभावे, यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी बँकेचे CEO मा. श्री. रावसाहेब वर्पे साहेब यांच्यासह बँकेतील वरिष्ठ अधिकारी, अधिकारीवर्ग व सेवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. श्री गणरायाच्या आशीर्वादाने बँकेच्या प्रगतीचा व समृद्धीचा मार्ग सदैव प्रशस्त होवो, हीच श्रीचरणी प्रार्थना करण्यात आली.
👉 क्लिक करुन वाचा साप्ताहिक वियजमार्ग
