मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री थेट पंतप्रधानांच्या भेटीला

। नवीदिल्ली । दि.08 जून । मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलेले असताना आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भेट असल्याने या भेटीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधानांची भेट घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठकीला सुरुवात झाली असून एक तासाहून अधिक वेळ बैठक सुरु आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेत आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यामुळेही या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post