। अहमदनगर । दि.21 जून । घरात कोणाला काहीएक न सांगता पंचवीस वर्षीय विवाहित महिला तिच्या तीन वर्षाच्या मुलीसह कुठेतरी निघून गेली. ही घटना केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथे दिनांक 19 रोजी घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की ज्योती रवी उमाप (वय 25, राहणार शास्त्रीनगर, केडगाव) महिला घरात कोणाला काहीएक न सांगता पहाटेच्या सुमारास लहान मुलगी सानिकासह कुठेतरी निघून गेली. घरच्यांनी तिचा नातेवाईकांकडे व सर्वत्र शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी रवी विठ्ठल उमाप यांच्या फिर्यादीवरून हरवल्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बी. एस. इळे करीत आहे.
हरवलेल्या / महिलेचे वर्णन-शरीर बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहरा गोल, नाक बसके, उंची पाच फूट, अंगात पांढरा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. सोबत असलेली तीन वर्षाची सानिका ही अंगाने सडपातळ, रंग निमगोरा, चेहरा गोल, डोळे काळे, अंगात फ्रॉक घातलेला आहे.

या दोघीं बाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन नंबर-0241- 2416117 आणि पोलिस हवालदार बी. एस. ईखे (मोबाईल 9923600605) या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.