जाळपोळ करुन दहशत करणारा जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 केडगावात सत्तूर घेऊन दहशत!


। तरुणाच्या मुसक्या आवळल्या

। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


।  अहमदनगर । दि.21 जून । केडगांव इंडस्ट्रीअल परिसरामध्ये एसीसी सिमेंट कंपनी ऑफिसची जाळपोळ करून हातात सत्तूर घेऊन दहशत निर्माण करणार्‍याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. भिमा सर्जेराव सकट (वय 32, रा. स्टेशन रोड, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मल्लीनाथ हनुमंत बोगले (वय 44, धंदा एसीसी सिमेंट, व्यवस्थापक यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली होती. दरम्यान, या भीमा सकट याने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कंपनीला व व्यवस्थापकाला धडा शिकविण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे.  

केडगाव इंडस्ट्रीअल एरिया अहमदनगरमधील एसीसी सिमेंट कंपनीमधून भिमा सकट यास कामावरुन काढून टाकल्याच्या रागापोटी ऑफिसमध्ये येऊन सत्तूरचा धाक दाखवून शिवीगाळ, दमदाटी करुन धक्काबुक्की देत निघून गेला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास भिमा सकट व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी ऑफिसच्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश करत

काहीतरी ज्वलनशील पदार्थ आत टाकून आग लावून नुकसान केले. याबाबत कोतवालो पोलीस ठाण्यात भादंवि कलम 436,323, 504, 506 सह आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी आजपावेतो फरारच होता. स्थानिक पोलोस स्टेशनचे पोलीस पथक सदर आरोपोचा शोध घेवून सुध्दा तो मिळून येत नव्हता.

तसेच, सोमनाथ अभिमन्यू लोखंडे (वय 39 धंदा ड्रायव्हर) यांनी नगर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की  के.सी. रोलर अ‍ॅण्ड फ्लोअर मिलच्यासमोर, चास शिवार ता. जि. अहमदनगर येथे माझी गाडी (एम.एच. 12 के.पी. 4578) आटा भरुन पार्कींगमध्ये लावली होती. तेथेही भिमा सकट हा विनानंबर प्लेटची मोपेड गाडी

घेवून येत रघुजी ट्रान्सपोर्टची कोणतीही गाडी येेथे चालू देणार नाही, मला दिसल्यास मी तो फोडून टाकेन असे म्हणून त्याने गाडीवर दगडफेक करुन सदर गाडीसमोरील काच फोडून माझ्या केबीनमध्ये येवून मला शिवीगाळ व मारहाण करत खिशातील दोन हजार रुपये बळजबरीने काढले.यानंतर तुमचे ट्रान्सपोर्टची गाडी मला दिसल्यास फोडून जाळून टाकेल, अशी धमकी दिली आहे.

याबाबत भादंवि कलम 392, 323, 504,506 427 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहाता व सदर आरोपीची वाढती दहशत पाहून त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना

सदर आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळे पथक तयार करण्याचे आदेश काढले. त्यानुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ संदीप घोडळे, पोना संदीप पवार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, कमलेश पाथरुट, जालींदर माने यांचे स्वतंत्र पथक तयार करुन सदर आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर भीमा सकट हा केडगाव शिवारात आल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली.


 

 


Post a Comment

Previous Post Next Post