एमआयडीसीतील कंपनीतून चोरी

। अहमदनगर । दि.01 जून । कंपनीच्या आवारात असलेले 61 हजार चारशे रुपये किमतीच्या प्लॅस्टिकच्या नवीन बादल्याचे तीन बंडल प्लास्टिकच्या घमेल्याचे सात बंडल चोरून नेले.

याबाबतची अधिक माहिती अशी की अमित विलास रेगे ( वय.43 रा.पाईपलाईन रोड सुदर्शन कॉलनी सावेडी ) यांची एमआयडीसी येथे विवेक पोली प्रॉडक्ट नावाची प्लॉट नंबर डी 82 येथे कंपनी आहे.

या कंपनीत काम करणार्‍या बंडू किसन वाघ ( वय 32 राहणार दर्गादायरा मुकुंद नगर ) याने कंपनीतील प्लास्टिक नवीन बादल यांचे तीन बंडल प्लास्टिक घमेल्याचे सात बंडल असे 61 हजार चारशे रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अमित रेगे यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास सहाय्यक फौजदार लोखंडे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post