...वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची : खा.संजय राऊत

। मुंबई । दि.10 जून । भाजपला सत्तेपासून दुर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रसेने सत्ता स्थापन केल्यापासून शिवसनेवर भाजप नेते वारंवार आरोप करत असतानाच आता अचानक चंद्रकांत पाटील म्हणाले की, वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते.

जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच, असं चंद्रकांत पाटील काल पुण्यात म्हणाले होते. त्यांना  प्रतिउत्तर देताना खा.संजय राऊत म्हणाले की, वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची असा टोला चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्याश आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

त्यावर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये ही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. 

Post a Comment

Previous Post Next Post