। अहमदनगर । दि.10 जून । प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुमच्या दरवाज्याचे कडी-कोयंडा कुलूप तोडून अज्ञात चोराने पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन बॅटर्या व इन्वर्टर चोरून नेली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील निमगाव येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की पाथर्डी तालुक्यातील निमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूमच्या दरवाजाची सोडून चोरांनी पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन बॅटर्या इन्वर्टर चोरून नेले.
याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी डॉक्टर बाबासाहेब महादेव होडशिळ यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस हवालदार दळवी हे करीत आहेत.
