विनयभंग प्रकरणातील आरोपींना 24 तासांत पोलिसांनी केले गजाआड

। अहमदनगर । दि.09 जून । तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंग व जबरी चोरी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आरोपींना 24 तासांत पोलिसांनी पकडले.तोफखाना पोलिसांनी दोन दिवस शहरात कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबविली. गेल्या 8 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मिस्कीन मळा येथील शादवल बाबा दर्ग्यास फुले वाहून महिला पायी घरी चालली होती.

या ठिकाणी सलमान शेख व त्याचा भाऊ आला. विनयभंग करून गळ्यातील सोन्याची पोत ओढून धूम ठोकली. सलमान उर्फ मायकल एजाज शेख व त्याचा भाऊ (रा. मुल्ला कॉलनी, महाराष्ट्र किराणा दुकानासमोर मुकुंदनगर) यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सलमान उर्फ मायकल एजाज शेख यास शिताफीने पकडले. बाललैंगिक अत्याचार प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील प्रकाश रावसाहेब उमाप (वय 20 रा. वारूळाचा मारुतीजवळ, नालेगाव, नगर) याला शहरातून अटक केली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज मेढे, हवालदार शकील सय्यद, पोलिस नाईक अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, शैलेश गोमसाळे, सचिन जगताप यांनी केली.


Post a Comment

Previous Post Next Post