अज्ञात वाहनाच्या धडकेत भंगार वेचणार्‍या इसमाचा मृत्यू

। अहमदनगर  । दि.10 जून । श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव गावातून जाणार्‍या नगर दौंड राज्य मार्गावर रात्री नऊ वाजता प्रतिक पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत भंगार वेचून, उदरनिर्वाह करणार्‍या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 जून रोजी घडली आहे.

बाळासाहेब बबन फटे (वय 56) राहणार मढेवडगाव हे सायकलवरून आपल्या घरी परतत असताना, नगर दौंड रोडवरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर सायंकाळी 9 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाले. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी 108 क्रमांकावर फोन करून अ‍ॅम्बुलन्स मागवली.

मात्र, त्यात आलेल्या डॉक्टरांनी अपघातग्रस्त फटे यांची प्राथमिक तपासणी करून, ते मयत झाले असल्याचे सांगितले. यानंतर मयत बाळासाहेब फटे यांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. भंगार गोळा करून, कुटुंबाचे पालन, पोषण करणार्‍या बाळासाहेब फटे यांच्यावर अकस्मात आलेल्या दुर्दैवी मृत्युनंतर परिसरात दुःख व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post