मार्च 16 पासून आजपर्यंत कारवाई
। अहमदनगर । दि.08 जून । नगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी आयुक्त शंकर गोरे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती निहाय कोरोना दक्षता पथक स्थापन करून शशिकांत नजान, परिमल निकम, संतोष लांडगे, कल्याण बल्लाळ यांना दक्षता पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दि.16 मार्च पासून कोरोना फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन करणार्या नागरिकांव चार दक्षता पथकांनी कारवाई केली. या कारवाईत आतापर्यंत 6 लाख 63 हजारर 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी आयुक्त शंकर गोरे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती निहाय कोरोना दक्षता पथकांची स्थापना केली. शशिकांत नजान, अभियंता परिमल निकम, संतोष लांडगे, कल्याण बल्लाळ यांना या पथकांचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते.
आयुक्त शंकर गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 मार्चपासून या पथकाने नियम मोडणार्यांवर कारवाईचा बडगा उगारला. आतापर्यंत 545 दुकानदारांसह नागरिकांवर ही करावाई करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, शहरातील नागरिक या आजारापासून सुरक्षित राहावेत त्यासाठी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी या हेतूने पथकांनी मनपा व नागरिकांमध्ये समन्वयाचेही काम केले, अशी माहिती पथक प्रमुख शशिकांत नजान यांनी दिली.
या पथकात सूर्यभान देवघडे, राहुल साबळे, नंदकुमार नेमाने, भास्कर आकुबत्तीन, राजेश आनंद, अमोल लहारे, किशोर जाधव, सहाय्यक आयुक्त दिनेश सिनारे, प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर, अंबादास सोनावणे, मार्केट विभाग प्रमुख रमेश वाळेकर, राहुल तनपुरे, राजेंद्र बोरुडे, विजय नवले, बापू बेलेकर, नंदकुमार रोहोकले, पोपटराव वायाळ, कांगुडे, गणेश वरूटे, पी. बी. आंबेकर,
राजू गोरे, शैलेश दुबे, यू. आर. क्षीरसागर, एस. डी. जाधव, एस. एस. गायकवाड, आर. एस. साळवे, राहुल क्षीरसागर, शुकलेश्वर जोशी, शिवाजी गुंजाळ, राजू रासकर, सुनील पारधे, राहुल तनपुरे, तुकाराम कोतकर, सुभाष झारेकर, बाळासाहेब रोहोकले, दत्ता जाधव, विलास नरसाळे,किशोर शिंदे, रिजवान शेख, अशोक रकटे, मच्छिद्रं कोर्हाळे, किशोर शिंदे या अधिकारी कर्मचार्यांनी ही कारवाई केली.



