। अहमदनगर । दि.05 जून । रेल्वे स्टेशन, आगरकरमळा भागातील नागरिकांच्या दळवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या आयुर्वेद कॉलेज कॉर्नर ते काटवन खंडोबा या रस्त्याच्या कामासाठी ठोक अनुदान या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 5 कोटी इतका निधी उपलब्ध झाला असून या रस्त्याच्या कामाबाबत लवकरच प्रशासकीय कार्यवाही करून कामास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
आयुर्वेद कॉलेज कॉर्नर ते काटवन खंडोबा या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 8 कोटी 50 लाख रुपये इतका निधी आवश्यक आहे. संबंधित रस्त्याचे काम व्हावे, यासाठी परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी आपणाकडे मागणी केली होती. या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला असता पहिल्या टप्प्यात रु. 5 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे व उर्वरित निधीही लवकर उपलब्ध होईल, असे आ. जगताप यांनी सांगितले.