टच फाउंडेशन करणार देशी वृक्षांच्या 4 लाख बियांचं शहरात वाटप

। अहमदनगर । दि.05 जून । टच फाउंडेशन नगर शहरात देशी वृक्षांच्या 4 लाख बियांचं वाटप करणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. गेल्या महिन्यात उद्योजक गौतम मुनोत यांनी सोशल मीडियात पोस्ट करत कोरोनामुळे आपल्याला सोडून गेलेल्यांच्या स्मरणार्थ एक झाड लावण्याचं आवाहन केलं होतं.

त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या आवाहनानुसार टच फाउंडेशन वृक्षारोपणाचा उपक्रम शहरभर राबवणार आहे. प्रत्येक नागरिकाला सहभागी होता यावे, म्हणून 4 लाख बियांचे वाटप केले जाणार आहे. आय लव्ह नगर, जितो अहमदनगर, सकल राजस्थानी युवा मंच, क्लासिक व्हील्स, स्नेहालय, आर्ट ऑफ लिविंग, न्यू संकल्प ग्रूप, अहमदनगर फिल्म फाउंडेशन, मी अहमदनगरकर यासारख्या संस्था या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.

या उपक्रमात सर्वांनी सहभागी होत आपल्या परीने, आपल्या आरोग्यदायी भविष्यासाठी वृक्षारोपण करून जास्तीत जास्त झाडं जगवावीत, असं आवाहन टच फाउंडेशन व गौतम मुनोत यांनी केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post