। अहमदनगर । दि.06 जून । गुजरात येथून खाद्येतल घेऊन पुण्याला निघालेला ट्रक पुण्याला न पाठविता त्या तेलाची परस्पर विल्हेवाट लावून गुजरात येथील व्यापार्याला तब्बल 31 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, तेलाचा ट्रक पुणे येथे न आल्याने त्या व्यापार्याने गुजरातच्या व्यापार्यास याबाबत विचारणा केली. त्यनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुजरात येथून एका ट्रकमध्ये तेलाचे डबे संगमनेर येथील दोघेजन घेऊन येत होते. ट्रकमधील तेलाचे डबे पुणे येथील एका व्यापर्याला पोहोच करावयाचे होते. हा माल पुणे येथे पोहचविण्या ऐवजी या दोघांनी परस्पर या मालाची विल्हेवाट लावली. आपला माल पुणे येथे पोहोचला नसल्याने गुजरात येथील व्यापार्याने याबाबत चौकशी केली.
चौकशीत मालाचा अपहार झाल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर गुजरातच्या व्यापार्याने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर येथील दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगात तपास सुरु केला असून खाद्यतेलाच्या चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शकयता वर्तवली जात आहे. तेलाच्या ट्रकसह दोघे जण फरार झाले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.