सहा लाखांचे बोगस बियाणे जप्त ; कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई

। अहमदनगर । दि.06 जून । पारनेरमध्ये बनावट वटाणा बियाणे विक्रीसाठी आले असल्याची माहिती मिळाल्याने त्या माहितीच्या आधारे कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत 6 लाखांचे बोगस बियाणे जप्त केले आहे.

या धडक कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी किरण गुलाबराव मांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत सविस्तर असे की, पारनेर पंचायत समितीचे कृषीअधिकारी वाळीबा नाथु उघडे, तालुका कृषी अधिकारी विलास रावजी गायकवाड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी जयंत किसनराव साळवे, मंडळाधिकारी किरण गणपत पिसाळ

हे दैनंदिन काम करत असताना त्यांना गुप्त बातमी दराने माहिती दिली की, येथील आंबेडकर चौकात ट्रक क्र.यूपी 92 टी 8149 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये वाटाण्याचे बोगस बियाणे असून, लगेच टापा टाकल्यास मुद्देमाल हाती लागेल.

या माहितीच्या आधारे या पथकाने सदचा ट्रकची झडती घेतली असता त्यात जालौन युपी या कंपनीचे 6 टन बोगस वाटाण्याचे बियाणे आढळून आले. याप्रकरणी पथकाने सर्व मुद्देमाल पारनेर पोलिस स्टेशनला आणून संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post