। अहमदनगर । दि.07 जून । संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील टाटा इंडिकॅशचे एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 72 हजार 500 रुपये रोकड लंपास केले.
शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनिवारी रात्री संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
माहिती अशी की, लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे येथे टाटा इंडिकॅशचे एटीएम आहे. रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने सदर एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीची केबल तोडून टाकली.
या एटीएममधून 1 लाख 72 हजार 500 रुपये रोकड लंपास केली. विजय केशव थेटे (रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता) यांच्या अखत्यारीत हे एटीएम असल्याने शनिवारी सकाळी त्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर थेटे यांनी पोलिसांना माहिती दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सातव, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक टी. आर. पवार यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनेचा पंचनामा केला.
याप्रकरणी थेटे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 252/2021 नुसार भादवि कलम 380, 427 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.