जखणगाव हनीट्रॅप प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

। अहमदनगर । दि.06 जून । नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडलेल्या तीन कोटी रुपयांच्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या गुन्ह्यातील फरार  आरोपी महेश बागले (रा.नालेगाव, नगर) याला रविवारी नगर तालुका पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले आहे. या गुन्ह्यातील, अन्य एक जण अद्याप फरार आहे.

नगर तालुक्यामध्ये दाखल असलेल्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू होता. त्यात एका अधिकार्‍याला तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरानातील मुख्य आरोपी असलेली  महिला व तिचा साथीदार अमोल मोरे याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता.

त्यांना या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुद्धा पोलिसांनी सुरू केलेली होती. या प्रकरणामध्ये असलेला आरोपी बागले व खरमाळे हे दोन जण फरार होते. रविवारी नगर तालुक्यातील शहा डोंगर परिसरात एका लग्नासाठी येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली.

त्या नंतर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांचे पथक महेश बागले याला अटक करण्यासाठी गेले असता पोलिसांना पाहताच तो पळू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.
 

Post a Comment

Previous Post Next Post