पाईपलाईन फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

। अहमदनगर  । दि.31 मे ।  शनिवारी झालेल्या पहिल्याच वादळी पावसामध्ये नगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. त्यातच वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. आज रविवारी शहराचे पाणी वितरण बंद झाले.

रविवारी मध्यरात्री 12.35 वाजता नगर शहर पाणी पुरवठा योजनेची नविन मुख्य जलवाहीनी (800 एम.एम.एम.एस.) विळद पंपींग स्टेशन येथे पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटली आहे. जलवाहीनी दुरुस्तीचे काम महानगरपालिके मार्फत मध्यरात्रीच सुरू करण्यात आले आहे.

सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळेरोड, तोफखाना, सर्जेपुरा, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार, नवीपेठ, माणिक चौक, सावेडी गावठाण व बालिकाश्रम रोड भागाला सोमवारी (31 मे), तसेच झेंडीगेट, सर्जेपुरा, मंगलगेट, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा, कोठी या भागाला मंगळवारी (1 जून) पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मनपाने दिली. महापालिका प्रशासनाने पाण्याचा वापर काटकरीने करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post