सुमोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

। अहमदनगर । दि.29 मे । भरधाव वेगातील टाटा सुमो अचानक  उजवीकडे वळाल्याने समोरून येणार्‍या मोटर सायकलला सुमोची जोरात धडक बसली. या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना श्रीरामपूर नेवासा रोड वरील सुरेगाव फाटा कमानीजवळ घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की रविंद्र किसन म्हस्के (राहणार टाकळीभान श्रीरामपूर) हा त्याच्या मोटरसायकल (क्रमांक एम एस 17 सी एच 5417) वरून श्रीरामपूर नेवासा जाणारा रोड वरून घराकडे जात असताना समोरून येणार्‍या सुमो (क्रमांक एम एच 17 व्ही 7599) अचानक रस्त्याच्या उजव्या बाजूला वळाल्याने समोरून येणार्‍या मोटर सायकल ला धडक दिली.

या धडकेत मोटरसायकलस्वार रवींद्र म्हस्के हा ठार झाला. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी पोलीस हवालदार मोहन शिंदे यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली.

Post a Comment

Previous Post Next Post