। अहमदनगर । दि.26 एप्रिल । महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुख्या जलवाहिनीला रविवारी (दि.25) रोजी शिंगवे गाव ते देवनदी दरम्यान गळती सुरु झाली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम आत सुरु होणार असल्याने मंगळवारी (दि.27) रोजी शहरात रोटेशन असेल्या भागात पाणीपुरवठा होणार नाही.
या भागात बुधवारी (दि.28) रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे. मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरुपाचे असल्याने त्याला अवधी लागणार आहे.
त्यामुळे सोमवारी शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळे भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे मंगळवारी रोटेशन पाणीवाटपाच्या मध्यवर्ती भागातील झेंडीगेट, सर्जेपुरा, मंगलगेट, केरी परिसर, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा आदी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या भागात बुधवारी पाणी सोडले जाणार आहे. बुधवारी पाणीपुरवठा असलेल्या सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगाव, कापडबाजर, आनंदीबाजार, नवीपेठ, माणिकचौक या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून या भागात ( दि.29) रोजी गुरवारी पाणी सोडण्यात येणार आहे असे मनपाकडून कळविण्यात आले आहे.