‘त्या’ व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत आढळला

। अहमदनगर । दि.26 एप्रिल । राहाता तालुक्यातील वाकडी येथे सार्वजनिक विहिरीत दोन दिवसापासून  गायब असलेल्या व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

आयुब  उर्फ लालाभाई मोहम्मद शेख (वय 45 रा.वाकडी ता.राहता) असे  मृत व्यक्तीचे नाव असून गावातील शिवाजी चौकात अंडापावचा व्यवसाय होता.  बुधवारी ( दि 21 )  सकाळी आयुब शेख हे राहत्या घरातून गायब झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.

त्यानंतर नातेवाईकांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद दाखल केली होती. मात्र शुक्रवारी सकाळी गावातील सार्वजनिक विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगलेल्या अवस्थेत येथीलच एका युवकानेच्या निदर्शनास आला. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला सदर माहिती देण्यात आली.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. अशोक अढागळे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post