। अहमदनगर । दि.26 एप्रिल । घराच्या पोर्च मधून आत प्रवेश करून अज्ञात चोराने घरातील साडेआठ हजार रुपये किमतीची टूरिस्ट बॅग तीस हजार रुपये रोग व महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला.
ही घटना बोरगाव रोड वरील सागर व्हिडिओ कॉल समोर डॉक्टर कॉलनी येथे घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की विजयसिंह गोवर्धन सिंह पुरोहित (रा.सागर व्हिडिओकॉन समोर डॉक्टर
कॉलनी वडगाव रोड, नगर ) यांच्या घराच्या पोर्च मधून दरवाजाच्या आत प्रवेश करून अज्ञात चोरांनी घरातील टूरिस्ट बॅग 38 हजार रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी विजय सिंह राजपूत यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार महादेव शिंदे हे करीत आहेत