जिल्ह्यातील सरपंचांनी ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे आवाहन
स्वच्छ व सुजल गावांसाठी सरपंच संवाद : भंडारी
| अहिल्यानगर | दि.17 जुलै 2025 | स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत गावे हागणदारीमुक्त ठेवून त्यांना अधिक आदर्श आणि टिकाऊ बनविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामपातळीवरील जनसहभाग वाढवण्यासाठी सरपंच संवाद हे नाविन्यपूर्ण मोबाईल ऍप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आनंद भंडारी यांनी केले आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
सरपंच संवाद हे ऍप्लिकेशन केंद्र शासनाच्या वतीने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. गावातील स्वच्छता व ग्रामविकासाचे उपक्रम पोस्ट स्वरूपात शेअर करू शकतात. तसेच इतर गावांतील उत्तम कामांची उदाहरणे पाहता येतात, ऍपव्दारे सरपंच यांना विषयानुसार संवाद साधता येतो, पाणी व स्वच्छता विषयक बातम्या व यशोगाथा मिळवता येतात,
तसेच प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्रही प्राप्त करता येते. हा उपक्रम सरपंचांना प्रेरणा देणारा संवादाचे नवे व्यासपीठ असून, ग्रामपातळीवरील सर्वांगीण, शाश्वत आणि लोकसहभागातून होणार्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे, असे भंडारी म्हणाले.