शरद पवार यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

। मुंबई । दि.09 एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. सध्या ते घरीच विश्रांती घेत असल्याने त्यांना निवासस्थानीच लस देण्यात आली.

पित्ताशयात खडे झाल्याने पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पवार विश्रांती घेत आहेत. यावेळी पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते.

शरद पवार यांनी ट्विट करून लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली तसेच डॉ. लहाने आणि वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणार्‍या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post