शेतकर्‍यांना केंद् सरकारने कमकुवत समजू नये : टिकैत

। सहारनपूर । दि.09 एप्रिल । तीन कृषी कायद्यां विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना केंद्र सरकारने कमकुवत समजू नये, असा इशारा देत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बुधवारी मोदी सरकारला लक्ष्य केले.

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन हळूहळू देशभर पसरत असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील एका कार्यक्रमानंतर राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर पुन्हा टीकास्त्र सोडले. जोपर्यंत हे तीन कृषी कायदे रद्द होत नाहीत,

तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. आंदोलन करणे हे आमचे काम असून, या शेतकरी आंदोलनाचा निष्कर्ष काय निघेल, हे सरकारने पाहावे. केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीत हे कायदे मागे घ्यावे लागतील. आंदोलन स्थळ शेतकर्‍यांचे घरच बनल्याचेही टिकैत म्हणाले.

त्यामुळे शेतकरी आंदोलनस्थळीच घर बांधत असल्याचा दावा त्यांनी केला. कोरोना महामारीसंदर्भातील दिशा-निर्देशांचे पालन करत शेतकरी हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा दावा यावेळी टिकैत यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post