। अहमदनगर । दि.09 एप्रिल । नगर तालुक्यातील देवगाव येथील मनीषा शिंदे यांची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल देवगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मनीषा शिंदे हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. पीएसआयपदी निवड झालेल्या मनीषाचा इतर विद्यार्थिनींनी आदर्श घ्यावा, असे आवाहन युवा नेते अंकुश वामन यांनी व्यक्त केले आहे.
याप्रसंगी अंकुश वामन, कुंडलिक वामन, पुजारी मच्छद्रिं जाधव, दत्तात्रय शिंदे, ज्ञानेश्वर ताकटे, ज्ञानदेव शिंदे, रावसाहेब वामन, गणेश वामन, महेंद्र वामन, तुषार शिंदे, नामदेव वामन, अवी वामन आदी उपस्थित होते.
