। अहमदनगर । दि.10 एप्रिल । माहिजळगाव येथुन कर्जत कडे जाणाऱ्या मोटारसायकल स्वारास मागून आलेल्या मोटारसायकलस्वारांनी धडक देऊन खाली पडले. आणी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना माहिजळगाव शिवारात घडली.
विशाल कल्याण मेंगडे ( वय 25 राहणार रविशंकर शाळेजवळ कर्जत ) हे माहिजळगाव वरून कर्जतकडे मोटारसायकल घेऊन जात असताना मागून आलेल्या मोटारसायकल दोघांनी त्यांना धडक देऊन खाली पाडले.
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील बेचाळीस हजार रुपये बळजबरीने चोरून नेले. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत.
