। अहमदनगर । दि.21 एप्रिल । शेतातील गहू ताब्यात देतो असे सांगुन आपापसात भांडण करून महिलेच्या पिशवीतील दागिने काढून घेऊन धमकी दिल्याची घटना जामखेड येथील डीसले वाडी शिवार निंबोणीची शेती येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की उमेश राम गिरी ( वय 41 राहनार पोखरी तालुका अंबड जिल्हा नाशिक हल्ली राहणार शहाबाग फाटा एमआयडीसी रोड वाई सातारा ) यांना लखन भोसले पारधी ( राहणार जामखेड ) यांनी व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी गहू देतो असे सांगून आपापसात भांडणे करून
उमेश गिरी यांची पत्नी यांच्या पिशवीतील तीन लाख सात हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेऊन मारहाण केली. व त्यांना इथून चालते व्हा नाही तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. व आरोपी तिथून पसार झाले.
याप्रकरणी जामखेड पोलिसांनी उमेश गिरी यांच्या फिर्यादीवरून भा द वि कलम 395 प्रमाणे दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बर्डे हे करीत आहेत.
