शेतकर्‍याच्या शेतामधुन गव्हाची चोरी

। अहमदनगर । दि.21 एप्रिल । जमिनीत पिकलेला गहू कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेल्याची घटना कर्जत तालुक्यातील केळवडी येथील शेत गट क्रमांक 120 मधील काढून भरुन ठेवलेला गहू अज्ञात चोराने चोरुन नेला. ही घटना केलवंडी शिवारात घडली.



या बाबतची  माहिती अशी की, शेतकरी सुनील काशिनाथ भुजबळ (वय 40 रा. भांडेवाडी तालुका कर्जत) यांच्या शेत गट क्रमांक 120 मधील शेत जमिनीत पिकलेला गहू काढून गोण्यामध्ये भरून ठेवलेला होता. 



त्या पैकी दहा हजार रुपये किमतीचा पाच मिनिटं दहा गोण्यांमध्ये 50 किलो एका गुणित भरलेला असा गहू कुणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेला.



या प्रकरणी पोलिसांनी सुनिल भुजबळ यांच्या फिर्यादीवरून भा.द.वी.कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post