कर्जत शहरात घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

। अहमदनगर । दि.27 एप्रिल । कर्जत शहरात झालल्या चोरीचा पाच दिवसांत छडा लावण्यात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना यश आले आहे. कर्जत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे.

विशाल नारायण दळवी (रा.शहाजीनगर, कर्जत), यांच्या घरचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी दि.20 एप्रिल रोजी रात्री 10 हजारांचा मोबाईल व 2 हजाराची रोकड चोरली होती.

माहिती अशी, दि.20 एप्रिल 2021 रोजी विशाल नारायण दळवी राहणार शहाजी नगर कर्जत, यांनी फिर्याद दिली की, राहत्या घरात कुणीतरी अज्ञात चोरट्याने रात्री घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून 10 हजार रुपये किंमतीचा एमआय कंपनीचा मोबाईल व रोख दोन हजार रुपये चोरून नेले.

सदर गुन्ह्याचा शोध घेण्याकरिता कर्जत पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करून गुन्हा उघड करण्याबाबत आदेशीत केले होते. तपास चालू असताना सदरचा गुन्हा हा श्रीगोंदा येथील आरोपींनी गोपनीय माहिती मिळाली.

त्यावरून दिनांक 20 एपिल रोजी विकी विश्‍वास काळे, रा.श्रीगोंदा यास ताब्यात घेऊन चोकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल दिली आहे. त्याचेकडून गुन्ह्यात गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच त्याचा जोडीदार नंद्या पायथ्या पवार, श्रीगोंदा यास दि.24 एप्रिल 2021 रोजी श्रीगोंदा येथून अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली 

कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनी सुरेश माने, पोलीस जवान अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार सलीम शेख हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post