बूथ हॉस्पिटलला तातडीने आर्थिक सहकार्य करा : प्रतीक बारसे यांचे आवाहन

। अहमदनगर । दि.27 एप्रिल । आज कोविड -19 मुळे संपूर्ण देश संकटकाळात आहे. अशा परिस्थितीत या संकटकाळात नगर शहराला आधार देण्याचे काम बूथ हॉस्पिटलने  केले आहे. तेव्हा या हॉस्पिटलला आर्थिक मदत करावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नगर  दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी केले आहे.

बूथ हॉस्पिटलने अत्यंत प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा निस्वार्थी भावनेने केली आहे. पण गेल्या एक वर्षापासून त्यांना एक रुपयाची मदत मनपाने केलेली नाही, ज्या परिस्थितीत त्यांनी काम केले ते खरचं कौतुकास्पद आहे. अशा नि:स्वार्थी काम करणार्‍या हॉस्पिटलाना व सेवा भावी संस्थांना आर्थिक मदत प्रोत्सहान मिळावे म्हणून केली पाहिजे.

तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी बूथ हॉस्पिटलला आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला वर्ष होऊनही अद्याप कोणतीही मदत प्राप्त झाली नाही. समाजातील दानशूर व्यक्तीमुळेच आजपर्यंत हॉस्पिटल आणि कर्मचारी मनापासून सेवा करीत सगळ्या परिस्थिती वर मात करीत आहेत.

त्यांचे आत्मबल वाढविण्याकरिता जिल्हा व मनपा प्रशासनांनी लवकरात लवकर त्यांना आर्थिक तरतूद अदा करावी, संबंधित अधिकारी कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने आयुक्तांनी येत्या सात दिवसांत त्यांना पूर्ण मदत करावी

अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा बारसे तसेच पक्षाचे जिल्हा महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण, अमर निर्भवणे, मनोज कर्डिले, भाऊ साळवे, सुनील भिंगारदिवे, शैनेशवर पवार, निखिल सूर्यवंशी, ओमकार गंजी, देविदास भालेराव आदींनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post