हॉटेलचे कुलूप तोडून साहित्याची चोरी

। अहमदनगर । दि.30 एप्रिल । हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोराने आतील सोळा हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. घटना पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेलमध्ये घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की श्रीमती उषा विश्‍वास फुंदे (वय.37 राहणार पाथर्डी) यांचे टाकळी फाटा येथे हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला.

आतील सोन्याची अंगठी, गॅसची टाकी, 2 शेगड्या, तीन हजार रुपये रोख असा सुमारे सोळा हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली.

याप्रकरणी पोलिसांनी उषा फुंदे यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे अधिक तपास पोलीस नाईक बांगर हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post