मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनामुळे निधन

। बडोदा । दि.30 एप्रिल । कोरोनाने अख्ख्या भारतात हाहाकार माजवला आहे. सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत अनेकजण कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत.

मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड यानेही कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. बडोद्यात वयाच्या 34व्या वर्षी त्याने अखेरचा श्‍वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्‍वात हळहळ व्यक्त होत आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा फटका भारताला बसला असून दैनंदिन रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्याही उच्चांक गाठत असल्याने तो चिंतेचा विषय ठरत आहे.

मात्र अद्यापही अनेकजण आपण एकदम ठणठणीत असून कोरोना होणार नाही अशा गैरसमजात आहेत. तुम्हालाही जर असेच वाटत असेल तर थांबा. कारण ही बातमी वाचून तुम्हीदेखील खडबडून जागे व्हाल.

कारण मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. तो 34 वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्‍वास घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post