। मुंबई । दि.24 एप्रिल । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
करोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राजकीय आघाडीवर मोठा धक्का बसला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर सीबीआयनं मुंबईत ठिकठिकाणी छापासत्र सुरू केलं आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे निदर्शने
केंद्राचे सरकार राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, छाप्यामध्ये काय मिळाले हे सीबीआयने सांगाव, वास्तविक पाहता देशमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज निदर्शने केली. या कार्यकर्त्यांना पोलिसा ताब्यात घेतले.
Tags:
Breaking