। अहमदनगर । दि.25 एप्रिल । पुणतांबा चौफुला ते झगडे फाटा रोडने भरधाव वेगात जाणार्या डंपरने समोरून येणार्या पिकप धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांची मोठे नुकसान झाले. ही घटना हॉटेल माईल्ड स्टोन जवळ रोडवर बुधवारी ( दि.21 ) घडली.
पुणतांबा चौफुला ने झगडे फाटा रोडने जाणार्या डंपर (क्रमांक एम एस 04 एच 34 44 ) समोरून येणार्या पिकप व्हान (क्रमांक एम.एच.15 इ.जी.6751 ) समोरून धडक दिली.
या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद हमीद असीम अन्सारी ( वय 39 रा. पिंजार गल्ली, येवला, नाशिक ) यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास सहायक फौजदार ससाने हे करीत आहेत.