। अहमदनगर । दि.25 एप्रिल । घराचा दरवाजा ढकलून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. व घरातील 62 हजार 500 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना जामखेड तालुक्यातील येथे घडली.
संतोष भीमराव दराडे ( वय.30 राहणार वंजारवाडी जामखेड) यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोराने ढकलून आत प्रवेश केला घरातील सामानाची उत्का पाचट करून बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने व हॉगरला नगरला लटकवलेल्या पँटच्या खिशातून रोख रक्कम चोरून नेली.
याप्रकरणी जामखेड पोलिसांनी संतोष दराडे यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पो ना. फुलमाळी हे करीत आहेत