विखे पाटील परिवाराकडून कोविड सेंटरला मदतीचा हात

। अहमदनगर । दि.25 एप्रिल । देशात व महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत असून रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर विखे-पाटील कुटुंबियांच्या वतीने शासकीय कॉविड सेंटरला एक लाख रुपये तसेच खाजगी कॉविड सेंटरला पन्नास हजार रुपये प्रत्येकी आर्थिक मदत पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे.



रुग्ण संख्येत वाढ झाल्यास दुसर्‍या टप्प्यातील मदत जाहीर करण्यात येईल असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले. श्रीगोंदा तालुक्यातील कॉविड सेंटर पाहणी करून तेथील रुग्णांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.



श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव,घारगाव, पिंपळगाव पिसा, बेलवंडी बु,लोणी व्यंकनाथ व श्रीगोंदा शहरात कोविड सेंटर ला भेट दिली. तसेच विखे पाटील कुटुंबा तर्फे शासकीय कोविड सेंटरला 1 लाख व खाजगी कोविड सेंटर ला प्रत्येकी 50हजार रु चा धनादेश देण्यात आला.



याप्रसंगी माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणासाहेब शेलार, जि.प. सदस्य सिध्यस्वर देशमुख, माजी सभापती पुरुषोत्तम लगड,माजी सभापती बाळासाहेब नहाटा, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, अमित नलगे, सरपंच सौ खोमने, भाजपच्या महिला कार्याध्यक्षा सौ अनुजा गायकवाड व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.



खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील अनेक खाजगी डॉक्टर कॉविड रुग्णांना मोफत आपली सेवा देत असून त्यांचे मी आभार मानतो, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील गाव गावच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून सेंटर सुरू केले ही आनंदाची बाब आहे. 



श्रीगोंदा तालुक्यातील कॉविड सेंटरचे आदर्श घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये कॉविड सेंटर सुरू झाल्यास नगर शहरातील हॉस्पिटलमधील ताण कमी होण्यास मदत होईल. देशासह महाराष्ट्रामध्ये रेमडेसीविर इंजेक्शन तुटवडा फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.



त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक यांचे इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, कोरोना बाधित रुग्णांना गरज भासल्यास रेमडेसीविर इंजेक्शन देण्यात यावे असे आवाहन डॉ.विखे पाटील यांनी डॉक्टरांना केले.

Post a Comment

Previous Post Next Post